Wednesday, May 4, 2016

-: दत्तात्रयांचे सोळा अवतार :-

योगिराज :-
🌷ब्रम्हदेवाचे मानसपुत्र 'अत्रि' हे पुत्र प्राप्तीसाठी पत्निसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुध्द १५ स प्रकट झाले. त्यांचे रुप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार 'योगिराज' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता.....

अत्रिवरद :-
🌷अत्रिऋषीनी ऋक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता 'अत्रिवरद' या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रम्हा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रीना वाटले. तेव्हा ते म्हणाले,"तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस, तोच आम्हां तिघात आहे.' या अत्रिवरदाचे रुप तप्त सुवर्णकांन्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षङभुज होते...(जन्म :-कार्तिक कृष्ण प्रतिपदा)

दत्तात्रेय :-
🌷अत्रिवरदाने अत्रिऋषीना वर मागण्यास सांगितले. तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रिंनी मागितला. त्यावर 'तथास्तु' म्हणून बालरुपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले. ते दिगंबर रुप मदनासारखे सुंदर व नीलमण्यासारखे तेजस्वी होते. मुख चंद्राप्रमाणे व हात चार होते. हाच दत्तात्रेयांचा 'दत्तात्रेय' नामक तिसरा अवतार....(जन्म :-कार्तिक कृष्ण २)

कालाग्रिशमन :-
🌷यानंतर आपणांस औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करु लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरिरात कालाग्नी प्रकट झाला व त्याचा दाह होऊ लागला. तेव्हा याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रुप घेऊन प्रकट झाले. म्हणूनच यास 'कालाग्निशमन'  हे नाव पडले...(जन्म :- मार्गशीर्ष शुद्ध १५)

योगीजनवल्लभ :-
🌷या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार 'योगिजनवल्लभ' या नावाने प्रसिद्ध आहे....(जन्म :-मार्गशीर्ष शुद्ध १५)

लिलाविश्वंभर :-
🌷दत्तात्रेयांचा सहावा अवतार 'लिलाविश्वंभर' ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला....(जन्म :-पौष शुद्ध १५)

सिद्धराज :-
🌷भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रुप धारण केले आणि अनेक चमत्कार करुन सिध्दांचे गर्वहरण केले, व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा 'सिध्दराज' नावाचा सातवा अवतार....(जन्म :-माघ शुद्ध १५)

ज्ञानसागर :-
🌷सिध्दीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रुपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील 'ज्ञानसागर' नावाचे रुप धारण केले....(जन्म :-फाल्गुन शुद्ध १०)

विश्वंभरावधूत:-
🌷पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला....(जन्म :-चैत्र शुद्ध १५)

मायामुक्तावधूत:-
🌷भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी 'मायामुक्तावधूत' या नावाचा दहावा अवतार घेतला...(जन्म :-वैशाख शुद्ध १४)

मायायुक्तावधूत :-
🌷दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव 'मायायुक्तावधूत' असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण सुरु होते. ही योगमाया होती.....(जन्म :-जेष्ट शुद्ध १३)

आदिगुरु :-
🌷दत्तात्रेयांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध आहे. मदालसेचा पुत्र 'अलर्क' यास योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार धारण केला.....(जन्म :-आषाढ शुद्ध १५)

शिवरुप :-
🌷एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा 'शिवरुप' नावाचा तेरावा अवतार....(जन्म :-श्रावण शुद्ध ८)

देवदेवेश्वर :-
🌷दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा चौदावा अवतार आहे....(जन्म :-भाद्रपद शुद्ध १४)

दिगंबर :-
🌷दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार 'दिगंबर' या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला....(जन्म :-आश्विन शुद्ध १५)

कमललोचन :-
🌷'कमललोचन' नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रकट झाले....(जन्म :-कार्तिक शुद्ध १५)

ॐ योगिराजाय नमः ।
ॐ अत्रिवरदाय नमः ।
ॐ दत्तात्रेयाय नमः ।
ॐ कालाग्निशमनाय नमः ।
ॐ योगिजन वल्लभाय नमः ।
ॐ लीलाविश्वंभराय नमः ।
ॐ सिध्दराजाय नमः।
ॐ ज्ञानसागराय नमः ।
ॐ विश्वंभरावधूताय नमः ।
ॐ मायामुक्तावधूताय नमः ।
ॐ मायायुक्तावधूताय नमः ।
ॐ आदिगुरु: नमः ।
ॐ शिवरुपाय नमः ।
ॐ देवदेवेश्वराय नमः ।
ॐ दिगंबरावधूताय नमः ।
ॐ कमललोचनाय नमः ।

श्री गुरुदेव दत्त....

Tuesday, May 3, 2016

मंदीर निर्माण व विद्यान

!! श्री !!
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते हे आपण पाहिले. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई.
आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभिगातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
मी काल म्हटल्याप्रमाणे जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानाथ प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस वभवतालात पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरातजरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.

मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हामोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळातजाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल अशी अपेक्षा करते.
शुभंम् भवतू !!